Big Breaking!  राष्ट्रवादीचे 12 आमदार शरद पवारांच्या संपर्कात- सूत्र

Big Breaking! राष्ट्रवादीचे 12 आमदार शरद पवारांच्या संपर्कात- सूत्र

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या अशी 12 आमदारांची इच्छा असून शरद पवारांच्या बड्या नेत्याकडून आमदाराना शरद पवारांचं वय आजारपण आणि साहेबांची इच्छा म्हणून भावनिक साद दिली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे 12 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यासोबत संपर्कात असल्याचे लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती दिली आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या अशी 12 आमदारांची इच्छा असून शरद पवारांच्या बड्या नेत्याकडून आमदाराना शरद पवारांचं वय आजारपण आणि साहेबांची इच्छा म्हणून भावनिक साद दिली आहे. तसेच काल मुंबईत झालेल्या अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत ही याबाबत चर्चा झाली. दोन्ही राष्ट्रवादीच विलीनीकरण करायचे असेल तर शरद पवार यांच्या पक्षाकडून लिखित प्रस्ताव आल्यास चर्चा करू शकतात.

सुनील तटकरेंनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये उघड आवाहन केलं होत कि तुतारी गटाने लिखित प्रस्ताव द्यावा .या संदर्भात देखील आमदारांना टेक्निकल बाबी सांगण्यात आल्या.सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांनी आमदारासमोर स्पष्ट भूमिका केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com