Supriya Sule
Supriya Sule

Supriya Sule : रोहित पवारांनंतर सुप्रिया सुळेंचं अजित पवार यांच्या अपघाताबद्दल ट्विट; ट्वीटमध्ये नेमकं काय?

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले .
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Supriya Sule) अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले . विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाला. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या विमान अपघातावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

यातच आता या घटनेचा तपास करण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर काल रोहित पवार यांच्याकडून पत्रकार परिषद घेत अनेक सवाल उपस्थित केले गेले. याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'आदरणीय अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर संबंध महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. समाजमाध्यमांतून अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना अतिशय तीव्र असून लोक अजूनही शोकाकूल अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार हे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मुद्दे, तथ्ये, शंका उपस्थित करीत आहेत. त्यांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत.'

'ही उत्तरे मिळण्यासाठी यंत्रणेकडून उशीर लागत असेल तर अस्वस्थता आणखी वाढेल. ती वाढू नये यासाठी या घटनेतील सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने पुढे येणे अतिशय गरजेचे आहे. व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा प्रत्येक भारतीयाचा घटनादत्त अधिकार आहे. रोहित व्यवस्थेपुढे जनतेच्या मनातील शंका, प्रश्न उपस्थित करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा मिळणे अतिशय गरजेचे असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे.' असे सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे.

Summary

  • रोहित पवारांनंतर सुप्रिया सुळेंचं अजित पवार यांच्या अपघाताबद्दल ट्विट

  • 'समाजमाध्यमांतून अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत'

  • 'रोहित व्यवस्थेपुढे जनतेच्या मनातील शंका, प्रश्न उपस्थित करीत आहे'

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com