BJP : राज्यसभेच्या उमेदवार निश्चितीसाठी फडणवीसांच्या 'वर्षा' निवासस्थानी भाजपची खलबतं, काय चर्चा झाली?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(BJP) राज्यसभेच्या उमेदवार निश्चितीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी भाजपची बैठक पार पडली. रात्री उशिरा भाजपच्या कोअर कमिटीची ही बैठक पार पडली असून नव्याने घोषित करण्यात आलेली कार्यकारिणी आणि यासोबतच राज्यसभेच्या उमेदवारीबाबत या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह रवींद्र चव्हाण, शिवप्रकाश, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, अतुल सावे, अमित साटम बैठकीला उपस्थित होते.
भाजपकडून 4 उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती मिळत असून केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
फडणवीसांच्या 'वर्षा' निवासस्थानी भाजपचं खलबतं
राज्यसभेच्या उमेदवार निश्चितीसाठी कोअर कमिटीची बैठक
भाजपकडून 4 उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती
