Congress' Jayashree Sonkamble elected as Mayor of Latur Municipal Corporation, Adv. Snehal Utge elected as Deputy Mayor
Congress' Jayashree Sonkamble elected as Mayor of Latur Municipal Corporation, Adv. Snehal Utge elected as Deputy Mayor

Latur Municipal Corporation : लातूर महापालिकेवर काँग्रेसची पुन्हा एकदा मजबूत पकड, 'ही' महिला महापौर

Jayashree Sonkamble : लातूर महापालिकेवर काँग्रेसने पुन्हा एकदा आपली पकड मजबूत केली आहे. शहरातील राजकारणाकडे राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम ठेवली.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Jayashree Sonkamble : लातूर महापालिकेवर काँग्रेसने पुन्हा एकदा आपली पकड मजबूत केली आहे. शहरातील राजकारणाकडे राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम ठेवली. या पार्श्वभूमीवर महापौर आणि उपमहापौर कोण होणार, याबाबत उत्सुकता होती. अखेर काँग्रेसने महापौरपदी जयश्री सोनकांबळे तर उपमहापौरपदी ॲड. स्नेहल उटगे यांची निवड जाहीर केली. इतर कोणतेही दावेदार नसल्यामुळे ही निवड औपचारिक ठरली आहे. महापौर पद महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने लातूरला महिला महापौर लाभणार आहे.

18 प्रभागांतील 70 जागांपैकी काँग्रेसने 43 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवलं. वंचित बहुजन आघाडीला ४ जागा मिळाल्या असून एकूण मिळून सत्ताधारी आघाडीच्या ४७ जागा झाल्या आहेत. भाजपला २२ जागांवर समाधान मानावं लागलं, तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला केवळ एकच जागा मिळाली.

निकाल जाहीर होताच महापालिकेच्या आवारात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नवनिर्वाचित महापौर जयश्री सोनकांबळे यांनी महिला सुरक्षा, स्वच्छता आणि सीसीटीव्ही व्यवस्था मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं सांगितलं. तर उपमहापौर स्नेहल उटगे यांनी पाणीपुरवठा, रस्ते आणि कचरा व्यवस्थापन या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना केल्या जातील, असं स्पष्ट केलं. एकूणच, चर्चेत असलेला लातूरचा गड काँग्रेसने यशस्वीपणे राखला असून शहराच्या विकासाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात

  1. लातूर महापालिकेवर काँग्रेसची पकड पुन्हा एकदा मजबूत

  2. स्पष्ट बहुमत मिळवत काँग्रेसने सत्ता कायम राखली

  3. शहरातील राजकारणाकडे राज्याचं लक्ष लागलेलं

  4. महापौर व उपमहापौर पदाबाबत उत्सुकता होती

  5. काँग्रेसकडून अधिकृत निवड जाहीर

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com