India Pakistan War : पाकिस्तानकडून LOC वर गोळीबार; गोळीबारात भारताच्या 2 जवानांना वीरमरण
भारताच्या परराष्ट्र सचिवांनी शनिवारी सायंकाळी दोन्ही देशांकडून शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र अवघ्या काही तासांतच पाकिस्ताननं जम्मू काश्मीरमधील काही भागांमध्ये ड्रोन हल्ले सुरू केले. या गोळीबारात भारताच्या दोन जवानांना वीरमरण आलं आहे. त्यातील एक वैद्यकीय सहाय्यक सार्जंट सुरेंद्र कुमार मोगा हे शहीद झाले आहेत.
तर 25 वर्षीय रायफलमन सुनील कुमार शहीद झाले आहेत. जम्मूतील त्रेवा गावात शहीद रायफलमन सुनील कुमार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. तसेच शहीद वैद्यकीय सहाय्यक सार्जंट सुरेंद्र कुमार मोगा यांचे पार्थिव देखील त्यांच्या गावी पोहचवण्यात आले आहे.
पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात, आरएस पुरा सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना या दोन्ही जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना प्रत्येक भारतीयाकडून भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे. तर त्यांचे हे शौर्य आणि देशासाठी बजावलेली कामगिरी प्रत्येक भारतीय नेहमीच लक्षात ठेवेल.
