Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा धमाका! थेट 100 टक्के टॅरिफची घोषणा; जागतिक बाजारपेठांना जबर हादरा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
अमेरिकेचे राष्ट्राधीक्षक डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'अमेरिका फर्स्ट' धोरणामुळे जगभर व्यापारविषयक अस्थिरता वाढली आहे. विविध देश अमेरिकेला पर्याय शोधत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करत आहेत, तर ट्रम्प यांनी अनेक देशांवर टॅरिफ अस्त्र सोडले आहे. आता त्यांनी कॅनडाला थेट धमकावले असून, चीनशी व्यापारी करार केला तर १०० टक्के टॅरिफ लावू, असा इशारा दिला आहे.
ट्रम्प यांनी रशियाची कोंडी करण्यासाठी आणि भारतासोबतची व्यापारी तूट कमी करण्यासाठी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला, ज्याचा भारताला मोठा फटका बसला. अन्य देशांनाही कमी-अधिक प्रमाणात टॅरिफचा फटका सोसावा लागला आहे. कॅनडाच्या बाबतीत ट्रम्प यांची नाराजी जुनी आहे. ते कॅनडाला अमेरिकेचे '५० वे राज्य' व्हावे, हीच इच्छा व्यक्त करतात. एका आठवड्यापूर्वी कॅनडाचे पंतप्रधान चीन दौऱ्यावर गेले होते आणि त्याच दौऱ्याच्या काही दिवसांत ट्रम्प यांनी ही धमकी दिली.
"कॅनडा चीनसोबत ट्रेड डील करत असेल तर आम्ही त्यांच्यावर १०० टक्के टॅरिफ लावू," असे ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले. या इशाऱ्याने कॅनडा हादरला आहे. ट्रम्प यांच्या या कठोर धोरणामुळे जागतिक व्यापाराचे भवितव्य धुक्यात गुंतले आहे. कॅनडा आता कसे पाऊल उचलणार आणि अमेरिका-कॅनडा संबंध कसे प्रभावित होणार, हे पाहणे रोचक ठरणार आहे.
• ट्रम्प यांची 100 टक्के टॅरिफ लावण्याची थेट धमकी
• कॅनडाने चीनसोबत व्यापार केल्यास कारवाईचा इशारा
• ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणामुळे जागतिक व्यापारात अस्थिरता
• अमेरिका-कॅनडा संबंधांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता
