India-France : भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; मोदी-मॅक्रॉन यांची सहकार्य वाढवण्याची घोषणा
मुंबईत आज भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय लिहिला गेला. नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही देशांतील सहकार्य अधिक वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सला भारताचा विश्वासू मित्र संबोधत तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, लघुउद्योग आणि महत्त्वाच्या खनिज क्षेत्रात एकत्र काम करण्यावर भर दिला. कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्य आणि डिजिटल संशोधनासाठी संयुक्त केंद्रे सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली. जागतिक स्तरावर शांतता राखण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मॅक्रॉन यांनीही संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात मोठ्या निर्णयांची माहिती दिली. लष्करी सहकार्य, आधुनिक विमानं आणि सागरी सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण करार झाल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीतून भारत-फ्रान्स संबंधांना नवी गती मिळणार असून दोन्ही देशांची भागीदारी अधिक बळकट होणार आहे.

