Donald Trump : अमेरिकेचा मोठा निर्णय; आयात शुल्कात कपात; 25% वरून 18% पर्यंत घट
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Donald Trump ) अमेरिकेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रशियाकडून तेल आयात सुरूच ठेवल्यानं अमेरिकन भारतावर अतिरीक्त २५ टक्के आयात शुल्क लादलं. या आदेशावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज स्वाक्षरी केली.
त्यानंतर आता अमेरिकेने मोठा निर्णय घेतला असून अमेरिकेने आयात शुल्कात कपात केली असल्याची माहिती मिळत आहे. भारतावरील आयातशुल्कामध्ये कपात करत असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली असल्याची माहिती मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत फोनवरुन चर्चा झाली. या चर्चेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी या आयात शुल्कात कपात करत असल्याची घोषणा केली. आता हे शुल्क २५ टक्क्यांऐवजी १८ टक्के असेल आणि त्याची अंमलबजावणी तत्काळ होईल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्याची माहिती मिळत आहे.
Summary
अमेरिकेचा मोठा निर्णय
आयात शुल्कात कपात
25% वरून 18% पर्यंत घट
