WhatsApp
WhatsApp

WhatsApp भारतातील वापरकर्त्यांसाठी नव्या नियमांनुसार 'हे' मोठे बदल

WhatsApp भारतातील वापरकर्त्यांसाठी नव्या नियमांनुसार बदल करणार आहे.भारत सरकारच्या सूचनेनुसार कंपनी सिम लिंकेज नियमांचे पालन करेल.
Published by :
Riddhi Vanne

WhatsApp भारतातील वापरकर्त्यांसाठी नव्या नियमांनुसार बदल करणार आहे.भारत सरकारच्या सूचनेनुसार कंपनी सिम लिंकेज नियमांचे पालन करेल.

1. नवीन नियम काय सांगतो?

  • मोबाईलमध्ये सक्रिय सिम कार्ड नसल्यास WhatsApp वापरता येणार नाही.

  • अ‍ॅप सुरू करण्यापूर्वी सिमची पडताळणी केली जाईल.

  • सायबर फसवणूक आणि फिशिंग थांबवण्यासाठी हा निर्णय.

2. माहिती कोणी दिली?

  • WABetaInfo ने एक्स पोस्टद्वारे अपडेट शेअर केले.

  • अँड्रॉईड बीटा व्हर्जन 2.26.8.6 मध्ये या फीचरची चाचणी सुरू.

  • सिम अ‍ॅक्टिव्हेशन तपासणीचा स्क्रीनशॉटही शेअर केला.

3. सध्याची व्यवस्था कशी आहे?

  • 6 अंकी कोड टाकून लॉगिन करता येते.

  • लॉगिननंतर सिम सक्रिय आहे का, याची तपासणी होत नाही.

  • बंद किंवा दुसऱ्याला दिलेल्या नंबरचा गैरवापर होण्याची शक्यता.

4. नवीन सिस्टिममध्ये काय बदल?

  • सिम-आधारित पडताळणी अनिवार्य.

  • अ‍ॅप सुरू करताना बॅकग्राउंड व्हेरिफिकेशन.

  • लॉगिननंतरही अकाउंट अ‍ॅक्सेससाठी पुन्हा पुष्टी करावी लागू शकते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com