Pune Mundhwa land Case
Pune Mundhwa land Case

Pune Mundhwa land Case : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण; अमेडिया कंपनीला तीन मार्चपर्यंत मुदतवाढ

मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pune Mundhwa land Case) मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहे. या जमीन घोटाळा प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीला तीन मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंढव्यातील सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपये आणि दंडाची रक्कम वसुलीसाठी दिलेली दोन महिन्यांची मुदत संपली.

कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आता विभागाने पंधरा दिवसांची मुदत कंपनीला वाढवून दिली आहे. त्यामुळे पुढील सुनावणी तीन मार्चला होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण

  • अमेडियाला तीन मार्चपर्यंत मुदतवाढ

  • पुढील सुनावणी तीन मार्चला होणार आहे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com