Pune
Pune

Pune : ट्रॅफिक कंट्रोलर बॉक्समधील बॅटरी चोरणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांनी केले जेरबंद

पुणे शहरातील ट्रॅफिक सिग्नलच्या चौकांमध्ये ट्रॅफिक कंट्रोलर बॉक्स मधील तब्बल 34 बॅटरी चोरणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांनी जेरबंद केले असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pune) पुणे शहरातील ट्रॅफिक सिग्नलच्या चौकांमध्ये ट्रॅफिक कंट्रोलर बॉक्स मधील तब्बल 34 बॅटरी चोरणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांनी जेरबंद केले असल्याची माहिती मिळत आहे. पुणे शहरातील विविध चौकांमध्ये सिग्नलमध्ये लाईट गेल्यानंतर ट्राफिक कंट्रोलर बॉक्समधील बॅटरीवर सिग्नल चालू राहतो. त्यामुळे वाहतूक सुरळीत चालण्यास मदत होते.

मात्र काही ठिकाणच्या ट्रॅफिक कंट्रोलरमधील बॅटरी चोरीला गेल्याचं निदर्शनास आल्यानंतर याबाबत वानवडी पोलिसांनी तपास केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 68 हजार रुपयांच्या 34 बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच चार आरोपींना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता रिक्षाचालक दीपक अमोल कांबळे (वय ३२, रा. रामनगर, रामटेकडी, हडपसर), चाँद उस्मान शेख (वय २८, रा. रामनगर, रामटेकडी, हडपसर), विकास ऊर्फ टकल्या विजय माने (वय ३६, रा. अरोरा टॉवर्सजवळील पदपथ, लष्कर), अली मुल्ला शेख (वय २७, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) यांना अटक करण्यात आली. पुणे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सिग्नल यंत्रणेतील बॅटरी बसविणे, तसेच अन्य तांत्रिक बाबींची जबाबदारी एका खासगी कंपनीकडे सोपवण्यात आली आहे.

Summary

  • ट्रॅफिक कंट्रोलर बॉक्समधील 34 बॅटरी चोरणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांनी केले जेरबंद

  • लाईट गेल्यानंतर ट्रॅफिक कंट्रोलर बॉक्समधील बॅटरीवर सिग्नल चालू राहतो

  • पोलिसांनी केलेल्या कारवाईत 68 हजार रुपयांच्या 34 बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com