Mumbai
Mumbai

Mumbai : मुंबईकरांनो, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, कचरा टाकल्यास भरावा लागणार 'इतका 'दंड

मुंबईत अनेक ठिकाणी आपल्याला कचरा कुठेही टाकलेला पाहायला मिळतो.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Mumbai ) मुंबईत अनेक ठिकाणी आपल्याला कचरा कुठेही टाकलेला पाहायला मिळतो. कचऱ्यांचे ढीग रस्त्यावर पाहायला मिळतात. कुठेही थुंकलं जाते. याच पार्श्वभूमीवर आता अस्वच्छता करणाऱ्यांवर वचक बसणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्या नागरिक आणि आस्थापनांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 250 रुपये, कचरा टाकल्यास 500 रुपये, ओला व सुका कचरा वर्गीकरण न केल्यास 200 रुपयांचा दंड आकारण्यात येणार असून यापूर्वी थुंकणे, कचरा टाकणे, यासाठी प्रत्येकी 200 रुपये दंड आकारला जात होता. मात्र, आता दंडाची रक्कम वाढविण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे.

Summary

  • स्वच्छतेचे नियम तोडाल तर खिशाला बसणार फटका

  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

  • सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, कचरा टाकल्यास भरावा लागणार दंड

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com