Mumbai
मुंबई
Mumbai : मुंबईच्या आर्थररोड कारागृहात कैद्याचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला
मुंबईच्या आर्थररोड कारागृहात कैद्यांच्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.
(Mumbai) मुंबईच्या आर्थररोड कारागृहात कैद्यांच्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. हल्यात पोलीस शिपाई वाघ हे जखमी झाले असल्याची माहिती मिळत असून लोकेंद्र उदयसिंग रावत असे या आरोपीचे नाव आहे.
कारागृहाच्या मेन गेटवरील मोकळ्या जागेत रावत हा पोलिसांकडे बघून शिवीगाळ करत असल्याची माहिती मिळत आहे.
यावेळी पोलिसांना त्याला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र आक्रमक झालेल्या रावतने पोलीस शिपाई वाघ यांच्यावर हल्ला केला. तसेच मध्यस्तीसाठी आलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की केली. या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
