Mumbai-Pune Expressway Traffic
Mumbai-Pune Expressway Traffic

Mumbai-Pune Expressway Traffic : मुंबई–पुणे महामार्गावरील 32 तासांचं वाहतूक कोंडी प्रकरण: वाहतूककोंडी करणाऱ्या टँकर चालकावर गुन्हा दाखल

मुंबई–पुणे महामार्गावर 32 तास वाहतूक कोंडी झाली होती.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai-Pune Expressway Traffic ) मुंबई–पुणे महामार्गावर 32 तास वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ टँकर पलटी झाला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला. सुरक्षेच्यादृष्टीने द्रुतगती महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आता या कोंडीस जबाबदार असलेल्या टँकर चालकाविरोधात खोपोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग व जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे चालू असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • मुंबई–पुणे महामार्गावरील 32 तासांचं वाहतूक कोंडी प्रकरण

  • वाहतूक कोंडी प्रकरणी टँकर चालकावर गुन्हा दाखल

  • वाहतूक कोडींस कारणीभूत ठरणाऱ्या टँकर चालकावर गुन्हा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com