Solpur Crime : सोलापूरात जावयाने घेतला सासऱ्याचा जीव! कारणही आलं समोर

Solpur Crime : सोलापूरात जावयाने घेतला सासऱ्याचा जीव! कारणही आलं समोर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावात एक गंभीर घटना घडली आहे. जावयाने आपल्या सासऱ्यावर चाकूने हल्ला करून त्यांचा जीव घेतला.
Published by :
Riddhi Vanne
Published on

दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावात एक गंभीर घटना घडली आहे. जावयाने आपल्या सासऱ्यावर चाकूने हल्ला करून त्यांचा जीव घेतला. या घटनेत सिकंदर मुलका शेख यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी सादिक सैफन दफेदार याने स्वतःलाही इजा करण्याचा प्रयत्न केला. त्याला जखमी अवस्थेत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. या प्रकरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भिवंडी-वसई रेल्वेमार्गावर अपघात

भिवंडी तालुक्यात खारबाव परिसरात रेल्वेच्या धडकेत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. चिंचपाडा येथील 55 वर्षीय चंद्रकांत पाचमारे शेतातून घरी परतत होते. रेल्वे रुळ ओलांडताना अचानक आलेल्या गाडीने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील चौकशी सुरू आहे. परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com