Latest Marathi News Update live : नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला पालिकेतर्फे आकर्षक रोषणाई

Marathi Live Headlines Updates: आज रविवार, दिनांक 25 जानेवारी 2026, राज्यातील थंडी, आजच्या ताज्या बातम्या, पत्रकार परिषद, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Latest Marathi News Update live
Latest Marathi News Update live

Lonavala: लोणावळा घाटात पहाटे ४.३० च्या सुमारास वाहतूक कोंडी

सलग सुट्टी असल्याने वाहनांच्या रांगा

वारकरी दिंडी आणि रिंगण सोहळ्याने भिवंडी आगरी महोत्सवाला केली सुरुवात

आगरी समाजाची संस्कृती, रूढी, परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पंधराव्या वर्षीही साई सेवक प्रतिष्ठानच्या वतीने सोनाळे येथील क्रीडांगणावर आगरी महोत्सवाला सुरवात झाली असून मनोरंजन,ज्ञान आणि प्रबोधन ही त्रिसूत्री अंगिकारत आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले .

या आगरी महोत्सवाची सुरुवात आगरी समाजाचे जेष्ठ नेते आर. सी.पाटील, आणि वारकरी सांप्रदायाचे महाराज यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून, फीत कापत, कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित पाटील, स्वागत अध्यक्ष यशवंत सौरे यांच्या उपस्थित आगरी समज व वारकरी दिंडी आणि रिंगण सोहल्याने सुरवात झाली असून, भिवंडी तालुका व ग्रामीण भागातील पंचकोशीतील अनेक नागरिक व महिला या आगरी महोत्सा मध्ये सामील होणारा असून पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला तालुका सह ठाणे जिल्ह्यातुन नागरिक मोठया संख्येने आगरी महोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत.

Republic Day 2026: 77 व्या प्रजासत्ताक दिनी अरबी समुद्रात तिरंगा फडकणार

शेकडो नौका ध्वजाला देणार मानवंदना...

कार्यक्रमासाठी दिव्यांग, गतिमंद आणि निराधार ज्येष्ठ नागरिकांना विशेष आमंत्रण...

Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचा बिनविरोध विजयाचा धडाका

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीने एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित करत अनेक जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्या समन्वयातून उभ्या राहिलेल्या उमेदवारांना विरोधकांकडून थेट लढत न मिळाल्याने जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्टपणे महायुतीच्या बाजूने झुकले असल्याचे दिसून येत आहे..

Kolhapur: कोल्हापुरातील राजर्षी शाहू वस्तुसंग्रहालयाला साडेतीन महिने कुलूप

शाहू वस्तुसंग्रहालयाचं काम पूर्ण होवून देखील उद्घाटन झालं नसल्याने वस्तू संग्रहालय कुलूप बंद अवस्थेत

राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित वस्तुसंग्रहालय तात्काळ सुरू करण्यासाठी शाहू प्रेमी आक्रमक

कसबा बावड्यातील शाहू महाराज जन्म स्थळावर प्रजासत्ताकदिनी करणार आंदोलन

26 जानेवारीला शाहू प्रेमी करणार उपोषण

Chhattisgarh: छत्तीसगड सीमेवर आठव्या पोलीस स्टेशनचे उद्घाटन

सीमेकडील माओवाद्यांना नियंत्रित करण्यासाठी आणखी एका पोलीस स्टेशनची उभारणी ….

Sports News: आयसीसीनं टी 20 वर्ल्ड कप 2026 साठी बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला दिली संधी

आयसीसीनं टी 20 वर्ल्ड कप 2026 साठी बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला स्थान दिलं आहे.

टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये बांगलादेश क गटात होता.

आता स्कॉटलंड बांगलादेशच्या जागी गट क मधून खेळेल.

आयसीसीनं आता बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला संधी दिली आहे.

Akola: अकोला रेल्वे पोलिसांची थरारक कामगिरी, ३५ फूट उंचीवर मृत्यूशी झुंज देणाऱ्या तरुणाचे वाचवले प्राण

अकोला रेल्वे स्थानकावर काल रात्री एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे पोलीस आणि आरपीएफ जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या तरुणाला मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप बाहेर काढले आहे.

अकोला रेल्वे स्थानकावरील पुलावर एक ३५ वर्षीय तरुण सुरक्षा जाळीच्या बाहेर उभा राहून खाली उडी मारण्याच्या तयारीत होता.

सोलापुरात माघीवारी निमित्त भगवे ध्वज घेत शेकडो भक्तांसह गोल रिंगण सोहळा संपन्न

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताई यांची पालखी आल्यानंतर गोल रिंगण सोहळ्याला सुरवात

शहरातील नार्थकोट प्रशालेच्या प्रांगणामध्ये गोल रिंगण सोहळ्याचे करण्यात आले होते आयोजन

गोल रिंगगणासाठी मृदंग वादक, डोक्यावर तुळस घेऊन महिला भगिनींचा सहभाग

पंढरपुरात उपस्थित राहू न शकणाऱ्या भक्तांसाठी खास सोलापुरात करण्यात येते रिंगण सोहळ्याचे आयोजन

हरियाणा कार्यक्रमात अभिनेत्री मौनी रॉयसोबत गैरवर्तन

अभिनेत्री मौनी रॉयने हरियाणातील करनाल येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. मौनी रॉयने सोशल मिडियावर याची माहिती दिलीय, कार्यक्रमादरम्यान काही लोकांचे वर्तन अत्यंत लाजिरवाणे आणि अस्वस्थ करणारे होते.

मालाड रेल्वे स्टेशन हत्या प्रक आरोप ओंकार शिंदेला करणार कोर्टात सादर

बोरिवली कोर्टात थोड्याच वेळात होणार सुनावणी

आरोपी ओंकार शिंदे आणि मयत अलोक सिंग यांच्यात ट्रेनमधून उतरण्यावरून वाद झाला, पोलिसांची माहिती

वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि यातच अलोकची हत्या झाली

कराड जवळ महामार्गावर कापसाने भरलेला ट्रक पलटी

बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड जवळ आटके टप्पा येथे कापसाने भरलेला ट्रक महामार्गावरच पलटी झाला... ही घटना आज सकाळी काही वेळापूर्वी घडली असून महामार्गावरच मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम झाले आहे... सलग सुट्ट्यांमुळे आणि महामार्गावरील या अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.

सोलापुरात जिल्हा परिषदेच्या 60 जागांवर भाजप उमेदवार मैदानात

सोलापूर जिल्ह्यात भाजप 68 जिल्हा परिषद गटातील 60 जागांवर भाजप उमेदवार मैदानात.

- जिल्ह्यात शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष सोबत तीन तालुक्यात भाजपची युती.

- माजी आमदार शहाजी पाटील यांच्यासोबत सांगोल्यात युती करत सात पैकी चार जागांवर भाजप तर तीन जागा शिंदे सेना निवडणूक लढणार.

- राष्ट्रवादी अजित पवार पक्षात माढा आणि करमाळा तालुक्यात भाजपकडून करण्यात आली युती

Mumbai-Agra Highway: मुंबई -आग्रा महामार्गावर भीषण अपघात

ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा अपघात

अपघातात 3 महिन्याच्या बाळाचा मृत्यू

बसचालकाला अटक, गुन्हा दाखल

Pune: पुण्यात 2 भाजप नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

फलक लावण्यावरुन हाणामारी

दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल

गुन्हा दाखल होताच माफीनामा

वरणगावातील राष्ट्रवादी SPच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश

राजेंद्र चौधरी यांचा जाहीर सभेत प्रवेश

Pune Crime: पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखालील वेश्याव्यवसाय

वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई

स्पा सेंटरवर विमानतळ पोलिसांची कारवाई

मेहबूब खान या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Kalyan: कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन नगरसेवक बेपत्ता असल्याचे लागले पोस्टर

कल्याणात ठाकरे गटाचे दोन नगरसेवकसंपर्कात नसल्याने आता ठाकरे गटाकडून नगरसेवक बेपत्ता असल्याचे शहरात पोस्टर लावण्यात आले आहेत या आधी ठाकरे गटाकडून पोलिसात नगरसेवक बेपत्ता आल्याची लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती तरीही त्यांचा शोध न लागल्यामुळे आता नगरसेवक मदुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे ठाकरे गटाच्या संपर्कात नसल्यामुळे कल्याण पूर्वेत आता नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत.

Shirdi: सलग सुट्ट्या आल्याने साईबाबांची शिर्डी भाविकांनी फुलली

प्रजासत्ताकदिनाच्या सलग सुट्यांमध्ये साईबाबांची शिर्डी भाविकांनी दुमदुमून गेलीये..

शनिवारी रात्री पासूनच शिर्डीत भावीकांचा प्रचंड ओघ वाढला आणि शिर्डी हाऊसफुल झाली.. वाहनतळ, रस्ते, दर्शनबारी सर्वत्र भावीकांची प्रचंड गर्दी असून शिर्डीला धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने पाहील जात असल्याचं दिसून येतय.. दोन दिवसांची सुटी आणि देवदर्शन असा अनोखा मेळ घालत भाविक शिर्डीत दाखल झालेय..

Pune: पुण्यातील एकाच प्रभागातून निवडून आलेल्या 2 भाजप नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा.

एकाच प्रभागातून निवडून आलेल्या 2 भाजप नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्लेक्स लावण्यावरुन हाणामारी; पोलिसांनी दोन्ही गटांवर दाखल केले गुन्हे..तुषार पाटील यांनी मागितली समाजाची माफी

मोठ्या संख्येने समाजातील लोक खडक पोलीस स्टेशनला झाले होते काल दाखल

बापू कांबळे यांनी केलं समाजातील लोकांना आव्हान प्रकरणात समाजाच्या भावना दुखावले असतील तर तुषार पाटील यांनी माफी मागितली आहे त्यामुळे हा विषय आम्ही सोडून दिल्याचा बापू यांनी सांगितलं

जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत वरणगावातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसैनेत प्रवेश

जळगाव अँकर:-भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटांमध्ये पक्ष प्रवेश केला

Anil Bonde छ बिहारमध्ये पण महाराष्ट्र भवन व्हायला हवं - अनिल बोंडे

अंदमान निकोबार मध्ये महाराष्ट्र भवन बनवण्याच प्रस्ताव दिला आहे . बिहार मध्ये पण महाराष्ट्र भवन झाला पाहिजे..म्हणजे कोणी बाहेर गावी . बिहार भवन होण्यास हरकत नाही झाला पाहिजे आपण बंगलोर मध्ये 60 मजली इमारत महाराष्ट्र भावांची बांधली पाहिजे.

Abolition of tariffs : अमेरिकेकडून भारतावर लादलेलं टॅरिफ रद्द होण्याची शक्यता.

रशियाच्या तेलाच्या भारताच्या खरेदीत मोठी घट झाल्यामुळे ट्रम्प प्रशासन भारतावरील ५०% आयात शुल्कापैकी २५% शुल्क मागे घेण्याचा विचार करू शकते अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी दिलेली आहे.

Kalyan UBT Corporator Unsold Poster:  कल्याणमध्ये ठाकरे सेनेची फलकबाजी

कल्याणात ठाकरे गटाचे दोन नगरसेवकसंपर्कात नसल्याने आता ठाकरे गटाकडून नगरसेवक बेपत्ता असल्याचे शहरात पोस्टर लावण्यात आले आहेत.

Malad accused in Borivali court : मालाड रेल्वे स्टेशन हत्या प्रकरणी आरोपीला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

मालाड रेल्वे स्टेशन हत्या प्रकरणी आरोपीला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. हत्येसंदर्भातला नवा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. 'CCTV फुटेजमध्ये आरोपीच्या हातात काहीच दिसत नाही' आरोपीचे वकील जयवंत पाटील यांचा न्यायालयात युक्तीवादमारतानाचे व्हिडिओ दिसत नाही.

Palash Mucchal Manahani On Mane : पलाश मुच्छलकडून विज्ञान मानेला मानहानीची नोटीस..

खोट्या आरोपांद्वारे बदनामी केल्याप्रकरणी पलाश मुच्चल यांच्याकडून सांगलीच्या विज्ञान मानेला १० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस.

Solapur ZP Election : सोलापुरात जिल्हा परिषदेच्या 60 जागांवर भाजप उमेदवार मैदानात...

सोलापूर जिल्ह्यात भाजप 68 जिल्हा परिषद गटातील 60 जागांवर भाजप उमेदवार मैदानात. जिल्ह्यात शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष सोबत तीन तालुक्यात भाजपची युती.

Dharmendra :  अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार..

अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार... माजी राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर...रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर यांना पद्मभूषण पुरस्कार

CM Devendra Fadnavis :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले गुरुद्वाराचे दर्शन

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी तखत सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे दर्शन घेतले आहे. नांदेड येथे गुरु देग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्य शहीदी सामगम वर्षानिमित्त हिंद दी चादर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या हिंद दी चादर कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितीती लावली .

Bhandara :  भंडारा–नागपूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंभोरा पुलावर प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य विद्युत रोषणाई

भंडारा व नागपूर जिल्ह्यांना जोडणारा ऐतिहासिक आंभोरा पूल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. वैनगंगा नदीवर उभारलेला एक अत्याधुनिक 'केबल-स्टेड' (Cable-stayed) पूल आहे

Pune :  पुण्यातून दोन बेपत्ता अल्पवयीन मुलांचा सुखरूप शोध

अकोला शहरातील बाल निरीक्षण गृहातून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुलांचा खदान पोलिसांनी तब्बल १४ दिवसांच्या अथक शोधानंतर पुण्यातून सुखरूप शोध लावला आहे. ७ जानेवारी रोजी शाळेसाठी गेलेले तुषार वडणे आणि सुशांत बांगर हे परत न आल्याने खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 Girish Mahajan : उद्या मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टमंडळ घेणार भेट

एकीकडे उद्या भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई विधानसभेवर मोर्चा काढलेला आहे.

Republic Day :  उद्या भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन..

संपूर्ण देशभर उद्या 77 वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जाणार आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण देशात उत्साह पाहायला मिळतोय.

New Mumbai Republic Day : नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला पालिकेतर्फे आकर्षक रोषणाई..

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे. तिरंग्याच्या रंगांनी संपूर्ण पालिका मुख्यालय उजळून निघाले आहे.

BDD Chawl :  वरळी बीडीडी चाळ वासियांचा म्हाडाविरोधात एल्गार..

म्हाडा अधिकाऱ्यांनी रहिवाशांना विश्वासात न घेता पुनर्वसनाच्या फेजमध्ये बदल केल्याने भ्रष्टाचाराचा आणि गोंधळाचा संशय.

Gate Way Of India : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील गेट ऑफ इंडिया तिरंगी रंगानं सजलं...

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील गेट ऑफ इंडिया तिरंगी रंगानं सजलं...

Hingoli : हिंगोली जिल्ह्यात नाफेडचे हमीभाव केंद्र बंद..

हिंगोली जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तूर पिकाची लागवड केली होती.मात्र शासकीय हमीभाव केंद्रावर तुरीची नोंदणी अद्याप बंद असल्याने शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा दराने खुल्या बाजारात तूर विकावी लागत आहे.

Pandharpur : प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक व नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आलीय.

Gadchiroli :  गडचिरोली पोलीस दलातील 31 अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपतींचे “पोलीस शौर्य पदक” जाहीर.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनातून झाली घोषणा संपूर्ण देशभरात 121 पोलीस शौर्य पदक जाहीर झाले, त्यात गडचिरोली पोलीस दलातील 31 जणांचा समावेश सन 2018 साली झालेल्या बोरीया-कसनासूर चकमकीतील शौर्यपूर्ण कामगिरीसाठी हे पदक देणार

Hingoli Accident : हिंगोलीच्या औंढा नागनाथ परभणी राज्य महामार्गावर उसाचा ट्रक पलटी

हिंगोलीच्या औंढा नागनाथ ते परभणी जाणाऱ्या राज्य महामार्गावर उसाने भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे.मुख्य रस्त्यावर ट्रक पलटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस रस्त्यावर सांडला असून,गेल्या एक तासापासून या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे.

Rupesh Savarkar:  भाजप नगरसेवक रुपेश सावरकरांची विजय रॅली

मुंबईतील वॉर्ड क्रमांक ६३ मध्ये दणदणीत विजय मिळवत भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून यशाची माळ गळ्यात घालणारे रुपेश सावरकर यांची आज विजयी रॅली अंधेरी परिसरात पार पडत आहे. एक युवा नगरसेवक म्हणून रुपेश सावरकर वॉर्ड मधील सर्व समस्या जाणून घेत त्यावर तोडगा काढत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com