Latest Marathi News Update live : जिल्हा परिषद निवडणुकीचं मतदान पुढे ढकललं

Marathi Live Headlines Updates: आज गुरुवार, दिनांक 29 जानेवारी 2026, राज्यातील थंडी, आजच्या ताज्या बातम्या, पत्रकार परिषद, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Latest Marathi News Update live
Latest Marathi News Update live

Ajit Pawar : अजित पवार यांचे पार्थिव सकाळी साडे सात वाजता काटेवाडी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार

महाराष्ट्राच्या राजकारणावर खोल ठसा उमटवणारे, माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्यभरातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात असून, त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि नेतेमंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar Funeral : अजित पवारांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार; अमित शाह आणि नितीन नबीन उपस्थित राहणार

(Ajit Pawar Funeral) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना एका शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. अजित पवारांसह या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची मिळत आहे. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडी करण्याची शक्यता

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले . विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना एका शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.अजित पवारांसह या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची मिळत आहे. या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

Ajit Pawar : अजित पवारांची कार्यतत्परता अखेरपर्यंत कायम; अपघातस्थळी सापडला कागदपत्रांचा ढीग

शासकीय बैठकांपासून राजकीय कार्यक्रमांपर्यंत आणि लोकांच्या गराड्यात सतत वावरणारे उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी अचानक काळाच्या पडद्याआड गेले. मात्र निधनाच्या अखेरच्या क्षणापर्यंतही ते आपल्या कामात पूर्णपणे गुंतलेले होते, हे अपघातानंतर समोर आलेल्या घटनाक्रमातून स्पष्ट झाले आहे. अपघातस्थळी सापडलेला महत्त्वाच्या कागदपत्रांचा ढीग अजितदादांच्या कार्यतत्परतेची साक्ष देतो. अजित पवारांनी आयुष्यभर जपलेली शिस्त आणि वेळेची काटेकोरता त्यांनी शेवटपर्यंत सोडली नाही. निधनाच्या आदल्या दिवशी मंगळवारी सकाळी नऊ वाजताच ते मंत्रालयात दाखल झाले होते. सकाळी ९ ते ९:३० या वेळेत त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभाग आणि मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. अर्थसंकल्प जवळ आल्याने त्यानंतर ९:३० वाजता नियोजित आर्थिक बैठक घेण्यात आली.

Ajit Pawar : अजित पवारांचं पार्थिव काटेवाडीकडे रवाना

सुनेत्रा पवार काटेवाडीत दाखल अजित पवारांचं पार्थिव त्यांच्या मूळ निवासस्थानी काटेवाडी येथे ठेवले जाणार आहे. सुनेत्रा पवार काटेवाडीत पोहोचल्या असून त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे.

Ajit Pawar :  सकाळी 9 वाजेपर्यंत अजितदादांचं पार्थिव काटेवाडीत अंत्यदर्शनासाठी, सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले . विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना एका शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

Ajit Pawar : मातीत जन्म, मातीतच विसावा; अजित पवारांना आज बारामतीत अखेरचा निरोप

गेली अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकारणाचा अविभाज्य भाग राहिलेले कठोर प्रशासक, धडाडीचे नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने मास लीडर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी अपघाती निधन झाले. बारामतीजवळील गोजुबावी परिसरात लँडिंगच्या वेळी त्यांच्या खासगी विमानाचा भीषण अपघात झाला. विमान कोसळताच प्रचंड स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Ajit Pawar : काटेवाडीमध्ये ग्रामस्थांची मोठी गर्दी, रोहित पवारांकडून ग्रामस्थांसोबत संवाद

काटेवाडीमध्ये अजित पवार यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. रोहित पवार लोकांना समजून सांगताना दिसत आहेत.

Ajit Pawar : रांगेत उभा राहून काटेवाडीचे ग्रामस्थ घेत आहेत अजित पवारांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन

काटेवाडी येथे अजित पवार यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आलंय. यावेळी काटेवाडीच्या ग्रामस्थांना अंतिम दर्शनासाठी पाठवण्यात आले. रोहित पवार स्वत: गेटजवळ थांबले आहेत. महिलांना अगोदर सोडण्यात आलंय.

Ajit Pawar :  संपूर्ण पवार कुटुंबिय काटेवाडीत दाखल..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमानतळाच्या जवळ मोठा विमान अपघात झाला. या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. काटेवाडी हे पवारांचे मुळगाव असून येथे अजित पवारांचे पार्थिव पोहोचले आहे, संपूर्ण पवार कुटुंबिय काटेवाडीत दाखल झाले.

Ajit Pawar :  अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी राज ठाकरे काटेवाडीत दाखल

Ajit Pawar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीकडे रवाना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीकडे रवाना झाले आहेत. अजित पवार यांच्या अपघातानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे बारामतीकडे गेले होते.

Ajit Pawar : येवला, लासलगाव बंद ठेऊन नागरिक, व्यापाऱ्यांनी अजितदादाना दिली भावपूर्ण श्रद्धांजली...

उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे अकाली निधनाने मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शोककळा पसरली असून आज येवला, लासलगावचे नागरिक, व्यापाऱ्यानी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळून अजितदादाना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.अनेक कार्यकर्त्यांना आश्रू अनावर झाले काहींनी तर हंबरडा फोडला..

Amit Shah : गृहमंत्री अमित शहा यांना रिसिव्ह करण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे बारामती एअरपोर्ट वर दाखल रनवेवर रिसीव करण्यासाठी गेले

Ajit Pawar :  काटेवाडीत अजितदादांचे अंत्यदर्शन: ग्रामस्थांना अश्रू अनावर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या मूळ गावी, काटेवाडी येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. पहाटेपासूनच लाडक्या 'दादां'ना शेवटचा निरोप देण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली असून, सर्व नागरिक शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून दर्शन घेत आहेत. या प्रसंगी पवार कुटुंबातील सदस्य उपस्थित असून, रोहित पवार स्वतः गेटजवळ थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत. गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रथम महिलांना दर्शनासाठी सोडण्यात आले. आपल्या नेत्याला निरोप देताना अनेक महिला आणि ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले आहेत.

Supriya Sule : सुप्रिया सुळे विद्या प्रतिष्ठानवर, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

सुप्रिया सुळे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणावर पोहोचल्या आहेत. शदर पवारही तिथेच आहेत. अजित पवार यांच्या पार्थिवाच्या अंत्यसंस्काराची तयारी केली जात आहे.

Ajit Pawar funeral : अजित पवार यांना शासकीय मानवंदना देण्यात आली

अजित पवार यांना शासकीय मानवंदना देण्यात आली आहे. अजित पवार यांचे पार्थिव सध्या त्यांच्या मुळगावी काटेवाडी येथे आहे.

Ajit Pawar funeral : काटेवाडीकर भावूक अजित पवारांचे पार्थिव बारामतीकडे रवाना

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल मोठा विमान अपघात झाला. आज अजित बारामतीमध्ये 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

Ajit Pawar Funeral : अजित दादा परत या… काटेवाडीत कार्यकर्त्यांचा आक्रोश…

(Ajit Pawar Funeral) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना एका शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Sharad Pawar : शरद पवार विद्या प्रांगणात, अजित पवारांचे पार्थिव काटेवाडीकडून बारामतीकडे रवाना

अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीतून बारामतीकडे रवाना झाले आहे. यापूर्वी संपूर्ण कुटुंबिय उपस्थित दिसत आहेत. मात्र, शरद पवार विद्या प्रांगणात अगोदरच गेले. अजित पवार यांचे पार्थिव बारामतीत येण्यापूर्वीच शरद पवार विद्या प्रांगणात आहेत.

Ajit Pawar Funeral : बारामतीत शोककळा, अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय

अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्याकरिता लाखोंचा जनसमुदाय बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समजला आहे.

Ajit Pawar Funeral :  लाडक्या अजितदादांना अखेरचा निरोप…

अजित पवार यांचे काल निधन झाले. आज बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.

Western Railway: पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांची दिल्लीत बदली

सदस्य रेल्वे बोर्ड पायाभूत सुविधा पदावर विवेक कुमार गुप्ता यांची बदली

गुप्ता यांच्याकडे मध्य रेल्वेचा देखील अतिरिक्त कार्यभार होता.

तत्कालीन महाव्यवस्थापक विजय कुमार यांच्या मृत्यू नंतर गुप्ता यांच्याकडे मध्य रेल्वेची देखील जबदारी देण्यात आली होती.

गुप्ता यांच्या जागी मध्य व पश्चिम रेल्वेची जबादारी कुणाला मिळणार हे पाहणे महत्वाचे

*गुप्ता यांच्या बदलीमुळे तूर्तास दररोज 60 लाख प्रवासी संख्या असलेल्या उपनगरीय रेल्वेचे महाव्यवस्थापक पद रिक्त आहे*

Sports News: न्युझिलंड विरोधात टी20 मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताचा 50 धावांनी पराभव

मात्र मालिकेत भारताची 3-1 नं सरशी...शनिवारी अंतिम सामना

Kolhapur: कोल्हापुरात राजाराम तलाव परिसरात 83 किलो गांजा जप्त.

कोल्हापूरात कोकोपीटच्या नावाखाली पुण्यातून कर्नाटकात जाणारा 83 किलो गांजा जप्त

कोल्हापूरातील राजाराम तलाव परिसरात सापळा लावून राजारामपुरी पोलीसांनी केली कारवाई

कात्रज (पुणे) इथल्या समीर शेख टेम्पो चालकास अटक

20 लाख 78 हजार किमतीचा 83 किलो गांजासह टेम्पो असा 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई

चंद्रपुरात काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात

भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा

मुनगंटीवारांचा दावा वडेट्टीवारांनी फेटाळला

चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर बसवणार- वडेट्टीवार

रायगडच्या म्हसळ्यात शिवसेनेला मोठा धक्का

रायगड म्हसळ्यात शिंदे सेनेला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीतुन शिवसेनेत प्रवेश करणारे सात नगर सेवक अपात्र ठरले आहेत. दोन महिन्यापूर्वी या सात नगर सेवकांनी राष्ट्रवादीतुन शिवसेनेत प्रवेश केला होता. या सात नगर सेवकांविरोधात रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे पक्षांतर बंदी कायद्यान्वये तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या म्हसळा नगर पालिकेच्या 7 नगर सेवकांना अपात्र घोषित केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com