Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal

Harshwardhan Sapkal : मंत्रालयात अन्न, औषध प्रशासन विभागात ACBची कारवाई; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले...

मंत्रालयात झिरवाळांच्या अन्न, औषध प्रशासन विभागात ACBने कारवाई केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Harshwardhan Sapkal)मंत्रालयात झिरवाळांच्या अन्न, औषध प्रशासन विभागात ACBने कारवाई केली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला लाच घेताना अटक करण्यात आली असून आरोपीचे नाव राजेंद्र ढेरंगे असे आहे. एका मेडिकल स्टोअरचा निलंबित परवाना पुन्हा सुरू करण्यासाठी लिपिकाने आधी 50000 रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर 35000 रुपयांची लाच घेताना त्याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर लाच आरोपीला पकडण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मंत्रालयातील एफडीए विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अखत्यारीत येतो. या सर्व प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, 'मंत्रालयात एका कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचून एका लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाभ्रष्ट महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जनतेची कामे पैशाशिवाय होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावे.' असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Summary

  • मंत्रालयात झिरवाळांच्या अन्न, औषध प्रशासन विभागात ACBची कारवाई

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

  • 'जनतेची कामे पैशाशिवाय होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे'

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com