Ahilyanagar
महाराष्ट्र
Ahilyanagar : अहिल्यानगर गोळीबार प्रकरण; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
एका युवकावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ahilyanagar) अहिल्यानगर गोळीबाराच्या घटनेनं हादरलं असून एका युवकावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. अबरार शेख या युवकावर गोळीबार करण्यात आला असून कंबरेत गोळी लागल्याने तो युवक गंभीर जखमी झाला.
मागील भांडणाच्या कारणावरून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी आता गोळीबार करणारा मुख्य आरोपी सय्यद जैद रशीद उर्फ टैप्या याला तोफखाना पोलिसांनी संभाजीनगरकडे पळून जात असताना ताब्यात घेतले आहे.
यासोबतच जाबीर सय्यद आणि पप्पू मुसा शेख या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
Summary
अहिल्यानगरमध्ये युवकावर गोळीबार
कंबरेत गोळी लागल्याने अबरार शेख गंभीर जखमी
गोळीबार करणारा मुख्य आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात
