Ahilyanagar
Ahilyanagar

Ahilyanagar : अहिल्यानगर हादरलं! गोळीबारात युवक गंभीर जखमी, पोलीस तपास सुरू

अहिल्यानगर गोळीबाराच्या घटनेनं हादरलं असून रात्री उशिरा एका युवकावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Ahilyanagar) अहिल्यानगर गोळीबाराच्या घटनेनं हादरलं असून रात्री उशिरा एका युवकावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अबरार शेख या युवकावर गोळीबार करण्यात आला असून कंबरेत गोळी लागल्याने तो युवक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मागील भांडणाच्या कारणावरून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हल्लेखोरांचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसातील ही गोळीबाराची दुसरी घटना आहे.

Summary

  • अहिल्यानगरमध्ये युवकावर गोळीबार

  • रात्री उशिरा झाला गोळीबार

  • कंबरेत गोळी लागल्याने अबरार शेख गंभीर जखमी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com