Ajit Pawar : अजित दादांच्या अस्थींचं कऱ्हा नदी पात्रात आज होणार विसर्जन
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Ajit Pawar ) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते.
अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला असून या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बारामती येथे विद्या प्रतिष्ठानाच्या प्रांगणात काल अंत्यसंस्कार करण्यात आले.
दादांच्या अनेक कार्यकर्त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते. अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाली होती. आज अजित दादांच्या अस्थींचं कऱ्हा नदी पात्रात आज विसर्जन करण्यात येणार आहे.
Summary
अजित पवारांच्या अस्थी कऱ्हा नदी पात्रात करणार विसर्जित
विमान अपघातात अजितदादांचं निधन
गुरुवारी शोकाकुल वातावरणात पार पडले अंत्यसंस्कार
