Ajit Pawar Funeral
Ajit Pawar Funeral

Ajit Pawar Funeral : सावलीसारखे अजित पवारांच्या सोबत राहणारे बॉडीगार्डला अश्रू अनावर

विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Ajit Pawar Funeral) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. अजित पवारांसह या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची मिळत आहे. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीतील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते अजित दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी आल्याचे पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले असून सावलीसारखे अजित पवारांच्या सोबत राहणारे बॉडीगार्ड यांना देखील अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजित दादांचा सुरक्षा रक्षक धाय मोकळून रडतानाचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com