Ajit Pawar Death
Ajit Pawar Death

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू; अजित पवारांसोबत विमानात नेमके कोण होते?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृ्त्यू झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Ajit Pawar Plane Crash) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृ्त्यू झाला आहे. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांसह या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची मिळत आहे.

या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना एका शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले.

अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार यांच्या निधनाने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात असून कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. या अपघातग्रस्त विमानात अजित पवार यांच्यासह मुंबई पीएसओ HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट हे सर्व जण या अपघातग्रस्त विमानात असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com