Ajit Pawar Plane Crash Case
Ajit Pawar Plane Crash Case

Ajit Pawar Plane Crash Case : अजित पवार विमान अपघात प्रकरण; ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती समोर

अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारीला भीषण अपघात झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Ajit Pawar Plane Crash Case ) अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारीला भीषण अपघात झाला. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या विमान अपघातावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

यातच आता या घटनेचा तपास करण्यात येत असून अनेक खुलासे या प्रकरणात करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विमान अपघातानंतर सापडलेला ब्लॅक बॉक्स सुरक्षित बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

यासोबच बॉक्सवरअधिकाऱ्यांच्या सह्या करण्यात आल्या असून पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये याची ऑनलाईन नोंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • बारामती विमान अपघात प्रकरण

  • ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती

  • बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीत नोंद

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com