Mumbai Police
MUMBAI POLICE BOOT WOES HIGHLIGHTED BY AKSHAY KUMAR | LIGHTWEIGHT SPORTS SHOES SUGGESTED

Mumbai Police: पोलिसांची व्यथा अभिनेता अक्षय कुमारने मांडली थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे, हलकेफुलके स्पोर्ट्स शूजच ठरू शकतात सोयीस्कर

Akshay Kumar: मुंबई पोलिसांच्या बूटांमुळे पाय दुखत आहेत. अक्षय कुमार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे पोलिसांची व्यथा मांडली.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

आरामदायी वाटणारे बूटही चुकीच्या बांधणी, खराब साहित्याचा वापर आणि अपुऱ्या आधारामुळे पायांना त्रासदायक ठरू शकतात. आणि हेच काहीसे घडले आहे मुंबई पोलिसांच्या बाबतीत! अभिनेता अक्षय कुमार यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पोलिसांची 'बूट व्यथा' मांडली, पण प्रत्यक्षात हे बूट पोलिसांसाठी खूपच त्रासदायक ठरत आहेत.

चामड्याच्या या बुटांवर विविध प्रयोग करण्याऐवजी, हलकेफुलके स्पोर्ट्स शूज दिल्यास पोलिसांसाठी सोयीस्कर ठरेल, अशी चर्चा पोलिस दलात सुरू आहे. प्रायोगिक तत्त्वावर कंपनीने पुरविलेले बूट आता वाहतूक पोलिसांना दिले जात आहेत. मरिन ड्राइव्ह आणि दादासाहेब भडकमकर मार्गच्या चौक्यांमध्ये नेमणुकीवर असलेल्या पोलिसांना नुकतेच हे बूट दिले गेले, पण त्रास अजूनही कायम आहे. स्टीलची प्लेट उन्हात तापते, जाड 'हिल' असल्याने चालण्यात त्रास होतो आणि पाय दुखतात.

या परिस्थितीत आरामदायी बूट देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे पोलिसांचे काम अधिक सुरळीत होईल आणि शरीरावरचा ताण कमी होईल. प्रशासनाने बूटांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देऊन योग्य पर्याय उपलब्ध करून दिल्यास, हे पोलिसांसाठी आणि नागरिकांसाठी दोघांनाही फायदेशीर ठरेल.

Summary
  • मुंबई पोलिसांचे बूट जड आणि त्रासदायक, पाय दुखण्याचा अनुभव

  • अक्षय कुमार यांनी CM फडणवीसांसमोर पोलिसांची 'बूट व्यथा' मांडली

  • हलके, आरामदायी स्पोर्ट्स शूज दिल्यास काम अधिक सोपे आणि सुरक्षित

  • प्रशासनाने बूटांच्या गुणवत्तेवर लक्ष देऊन सुधारित पर्याय उपलब्ध करावे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com