Baramati
Baramati

Baramati : अजित पवार विमान अपघात प्रकरण; DGCA विरोधात अमोल मिटकरी आणि रोहित पवार बारामती पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार

अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारीला भीषण अपघात झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Baramati) अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारीला भीषण अपघात झाला. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या विमान अपघातावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

यातच आता या घटनेचा तपास करण्यात येत असून अनेक खुलासे या प्रकरणात करण्यात येत आहेत. या घटनेनंतर घातपाताचा संशयही व्यक्त केला जातो. याच पार्श्वभूमीवर आज DGCA विरोधात बारामती पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

आज रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे डीजीसीए विरोधात बारामती पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी जाणार आहेत.

Summary

  • बारामती विमान अपघात प्रकरण

  • रोहित पवारांना व्हीएसआर कंपनीवर संशय

  • DGCA विरोधात बारामती पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com