वाळू तस्करी वाढली; संतप्त संगमनेरकरांनी वाळूवर झोपून केले आंदोलन

वाळू तस्करी वाढली; संतप्त संगमनेरकरांनी वाळूवर झोपून केले आंदोलन

Published by :
Published on

आदेश वाकळे | संगमनेर शहरानजीकच्या प्रवरा पात्रातून वाळू उपशाच्या घटना वाढत चालल्या होत्या. प्रशासनाकडे तक्रार करूनसुद्धा कारवाई होत नसल्याने आज संतप्त संगमनेरकरांनी थेट वाळुवर झोपुन आंदोलन केले आहे. या आंदोलनाद्वारे प्रशासनाचे व राज्यकर्त्यांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे या आंदोलनानंतर आता वाळू उपशा कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वाळूतस्करांमध्ये प्रशासनाची धास्तीच न उरल्यामुळे प्रवरा पात्रातून कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवून वाळू उपसा सुरु होता. जुनाट रिक्षांसह ट्रॅक्टर तसेच विविध वाहनांतून रात्रंदिवस हा वाळू उपसा सुरु असतो. प्रशासनाने तक्रार करूनही कारवाई न होत असल्याने आज संतप्त झालेल्या संगमनेरकरांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आज सकाळी आठच्या सुमारास शहरातील व्यापारी, नागरीक तसेच पर्यावरणप्रेमींनी वाळू तस्करांविरोधात नदीपात्रात जाऊन झोपून आंदोलन करण्यात आले. तसेच भर दिवसा सुरु असणारा हा वाळू उपसा कोणालाही दिसत नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com