Mumbai Mayor
महाराष्ट्र
Mumbai Mayor : मुंबईच्या महापौर पदासाठी आज अर्ज दाखल प्रक्रिया; कुणाला मिळणार संधी?
भाजपकडून कुणाला महापौरपदासाठी संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Mayor) महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आता या निकालानंतर लक्ष लागले आहे ते म्हणजे महापौर आणि उपमहापौर कोण होणार? याच पार्श्वभूमीवर आता 11 फेब्रुवारीला मुंबईचा महापौर बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यातच आता मुंबई महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी आज ७फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. हे अर्ज सादर केल्यानंतर मतदानाच्या 15 मिनिटे आधी अर्ज मागे घेता येणार असल्याची माहिती मिळत आहे.
संख्याबळानुसार भाजपाचाच महापौर बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून भाजपकडून कुणाला महापौरपदासाठी संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
मुंबईच्या महापौरपदासाठी आज अर्ज दाखल प्रक्रिया
संख्याबळानुसार भाजपाचाच महापौर बसण्याची शक्यता
भाजपकडून कुणाला महापौरपदासाठी संधी?
