Narayan Kuche : नारायण कुचेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, चर्चांना उधाण
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Narayan Kuche) नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यातच आता छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत आमदार नारायण कुचे यांचा पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करत असल्याचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला आहे. एक व्यक्ती आमदार नारायण कुचे यांना मतदानासाठी पैसे वाटप करण्यासाठी अंधार पडू द्या असं म्हणतो.
त्यावेळी नारायण कुचे हे बिनधास्त पैसे वाटा, गोरगरीब लोकांचं भलं होऊ द्या, असा संवाद या रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येत आहे. . या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र या ऑडिओ कॉलची लोकशाही मराठी पुष्टी करत नाही.
Summary
छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीत पैशांचा पाऊस?
निवडणुकीत आमदार कुचेंकडून पैसे वाटप?
नारायण कुचेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
