Bacchu Kadu
Bacchu Kadu

Bacchu Kadu : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि मेळघाटातील आदिवासींच्या समस्यांसाठी बच्चू कडू पुन्हा मैदानात

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि मेळघाटातील आदिवासींच्या समस्यांसाठी बच्चू कडू पुन्हा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Bacchu Kadu ) शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि मेळघाटातील आदिवासींच्या समस्यांसाठी बच्चू कडू पुन्हा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान मेळघाटातील सलोना ते चिखलदरा पर्यंत बच्चू कडूंची 250 किलोमीटरची महापदयात्रा निघणार आहे.

सरकारला कर्जमुक्तीची आठवण करून देण्यासाठी आणि मेळघाटातील मागण्यांसाठी बच्चू कडूंची ही महापदयात्रा असणार आहे. महापदयात्रेच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंची आज अकरा वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे.

असून यापूर्वीही बच्चू कडूंनी अमरावती जिल्ह्यातील पापळ ते यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा गावापर्यंत पदयात्रा काढली होती. आजच्या या पत्रकार परिषदेमधून बच्चू कडू काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे आहे.

Summary

  • शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि मेळघाटातील आदिवासींच्या समस्यांसाठी बच्चू कडू पुन्हा मैदानात

  • बच्चू कडूंची 250 किलोमीटरची महापदयात्रा

  • बच्चू कडूंची आज महत्त्वाची पत्रकार परिषद

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com