Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा आज राष्ट्रव्यापी संप; देशभरातील बँकिंग व्यवहारांवर होणार मोठा परिणाम

बँक कर्मचाऱ्यांकडून आज राष्ट्रव्यापी संप पुकारण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Bank Strike) बँक कर्मचाऱ्यांकडून आज राष्ट्रव्यापी संप पुकारण्यात येणार आहे. सरकारी, खासगी, विदेशी, ग्रामीण आणि सहकारी बँकांमधील सुमारे आठ लाख कर्मचारी-अधिकारी एकदिवसीय राष्ट्रव्यापी संपावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

बँकांमधील कर्मचारी एकदिवसीय राष्ट्रव्यापी संपावर जाणार असून यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. सोमवार ते शुक्रवार असा 5 दिवसीय कार्य सप्ताह लागू करावा अशी बँक कर्मचाऱ्यांची मागणी असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता देशभरातील बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Summary

  • बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता

  • बँकांमधील कर्मचारी एकदिवसीय राष्ट्रव्यापी संपावर जाणार

  • '5 दिवसीय कार्य सप्ताह लागू करा'; बँक कर्मचाऱ्यांची मागणी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com