Bharat Bandh : कामगार संघटनांकडून आज भारत बंदची हाक; कारण काय?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Bharat Bandh) आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. देशातील विविध कामगार, बँक कर्मचारी आणि शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’चे आवाहन केले असून आज होणाऱ्या या देशव्यापी संपात 10 केंद्रीय ट्रेड युनियन सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
या बंदचा परिणाम अनेक क्षेत्रांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारत बंदमध्ये CITU, AITUC, INTUC, HMS, AICCTU, LPF आणि UTUC यासारख्या प्रमुख 10 कामगार संघटना सहभागी होणार असून नवीन कामगार कायदे, भारत-अमेरिका व्यापार करार, मनरेगातील बदल आणि अन्य धोरणांविरोधात ही हाक देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या नवीन चार कामगार कायद्यांमुळे कामगारांच्या नोकरीची सुरक्षा धोक्यात आली असल्याचे म्हणत याचा निषेध करण्यासाठी 10 केंद्रीय कामगार संघटनांनी एकत्र येत हा संप पुकारला आहे. चार नवीन कामगार कायदे रद्द करावेत, प्रस्तावित विधेयके मागे घ्यावीत आणि मनरेगा अधिक बळकट करावी, अशा प्रमुख मागण्या या संपामागे आहेत.
Summary
12 फेब्रुवारी देशव्यापी भारत बंदची हाक
नवीन कामगार कायदे, मनरेगा आणि रोजगार हमी योजना विरोधातील आंदोलन
बँका, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता
