Nagpur
महाराष्ट्र
Nagpur : 'मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला'; नागपूरात भाजपची बॅनरबाजी
नागपूरात भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nagpur) नागपूरात भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. नागपूरातील विविध भागात बॅनर लावण्यात आले असून 'मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला', 'आपलं हिंदूत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला'. असे बॅनरवर लिहिण्यात आले आहे.
महानगरपालिका निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर नागपूरात भाजपकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. मराठी, विकास आणि हिंदूत्वाच्यी मुद्द्यांवर निवडणूका जिंकल्याचा संदेश असलेले बॅनर नागपूरात पाहायला मिळत आहेत. बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत.
Summary
नागपुरात भाजपची बॅनरबाजी
“मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला”
“आपलं हिंदूत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला”
