शेतीसाठी नाथसागर धरणाच्या दोन्ही कालव्यातून तातडीने पाणी सोडण्यासाठी भाजपा आक्रमक

शेतीसाठी नाथसागर धरणाच्या दोन्ही कालव्यातून तातडीने पाणी सोडण्यासाठी भाजपा आक्रमक

Published by :
Published on

प्रतिनिधी : सुरेश वायभट
पैठण तालुक्यात कमी प्रमणात पाउस पडत असल्याने, अनेक भागात पेरण्या रखाडल्या तर ज्या भागात पेरणी झाली त्या भागात दुबार पेरणीचं संकट उभे राहिले आहे. शेतीच्या सिंचनासाठी नाथसागर धरणामधुन दोन्ही कालव्यातून तातडीने पाणी सोडावे , अशी मागणी पैठण तालुका भाजपाच्या वतीने तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

तालुक्यांमध्ये अजुनही जोरदार पाऊस पडला नासल्याने शेतकऱ्यांनी अजून पर्यंत पेरणी केली नाही मात्र काही ठिकाणी पेरणी झाली त्या सर्व पिक पाऊसाविना सुकून चालले आहेत. नाथसागर धरणातुन शेतीच्या सिंचनासाठी दोन्ही कालव्यातुन पाणी सोडावे अन्यथा पैठण तालुका भारतीय जनता पार्टी च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा निवेदनातुन दिला आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष डॉ सुनील शिंदे, महेश जोशी, भाऊसाहेब बोरुडे, विजय चाटुपळे, विजय ठाणगे, श्याम पंजवानी,यांची उपस्थिती होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com