BJP : सिंधुदुर्गच्या कोकिसरे पंचायत समितीत भाजपने खातं उघडलं; साधना नकाशे यांची बिनविरोध निवड
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(BJP) जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राज्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 7 फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काल शेवटची तारीख होती.
याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून आता सिंधुदुर्गच्या कोकिसरे पंचायत समितीत भाजपने खातं उघडलं असून साधना नकाशे यांची बिनविरोध निवड झाली आहे. कोकिसरे पंचायत समिती मतदारसंघातून भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून साधना सुधीर नकाशे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले.
तर त्यांना डमी म्हणून अक्षता सूर्यकांत डाफळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून कोणत्याही दुसऱ्या पक्षातून किंवा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे साधना सुधीर नकाशे यांची बिनविरोध निवड झाली आहे. कोकिसरे पंचायत समिती गणातून त्या बिनविरोध ठरल्या आहेत. मात्र, अर्ज मागे घेतल्यानंतरच त्याची अधिकृत घोषणा केली जाईल.
Summary
सिंधुदुर्गच्या कोकिसरे पंचायत समितीत भाजपने खातं उघडलं
साधना नकाशे यांची बिनविरोध निवड
अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने बिनविरोध
