धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदी भाजपचे प्रदीप कर्पे

धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदी भाजपचे प्रदीप कर्पे

Published by :
Published on

उमाकांत अहिरराव | धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदी भाजपचे नगरसेवक प्रदीप कर्पे यांची निवड झाली आहे.७३ पैकी ५० नगरसेवकांनी कर्पेच्या बाजूने मतदान केले असून ते आता धुळे महानगरपालिका महापौर असणार आहेत. प्रदीप कर्पे यांनी विजयानंतर पक्षाच्या नेत्यांचे आणि धुळेकरांचे आभार मानले. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीन महिन्यात सोडविण्याचे आश्वासन दिले.आरोग्याच्या समस्यांवरही लवकर तोडगा काढला जाईल असे आश्वासन कर्पे यावेळी धुळेकरांना दिले.

काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार मदिना पिंजारी यांनी १७ मतं मिळाली. एम आय एम च्या उमेदवार अन्सारी सईदा इकबाल यांना चार मतं मिळाली तर शिवसेनेच्या जोत्सना पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.बसपाच्या एक नगरसेवकही तटस्थ राहिल्या.कर्पेच्या माध्यमातून पंकजा मुंडे समर्थकांनी संधी देण्यात आली आहे.भाजपचे सर्व नगरसेवक एकसंघ राहिल्याने बंड अथवा चमत्काराच्या सर्व चर्चा व्यर्थ ठरल्या.

विजयानंतर प्रदीप कर्पे यांनी पक्षाच्या नेत्यांचे आणि धुळेकरांचे आभार मानले. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीन महिन्यात सोडविण्याचे आश्वासन दिले.आरोग्याच्या समस्यांवरही लवकर तोडगा काढला जाईल असे आश्वासन कर्पे यावेळी धुळेकरांना दिले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com