Samruddhi Expressway Accident
महाराष्ट्र
Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर कारचा अपघात; दोन जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Samruddhi Expressway Accident) समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे.
या अपघातात कारमधील आई व मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून झोपेमुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार समोरून जाणाऱ्या अवजड कंटेनरवर जोरात आदळली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Summary
समृद्धी महामार्गावर कारचा अपघात
अपघातात कारमधील दोन जणांचा मृत्यू
कंटेनरला कारची मागून धडक
