Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule : "कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झालेली नावं पक्षश्रेष्ठींना पाठवणार"

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी येत्या 16 मार्चला निवडणूक होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Chandrashekhar Bawankule) महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी येत्या 16 मार्चला निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली.

याच पार्श्वभूमीवर आता प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,"महाराष्ट्र कोअर कमिटीची भाजपाची बैठक झाली. आमच्याकडे जी नावं आलीय, ती नावं आमची कोअर कमिटी केंद्रीय कोअर कमिटीकडे पाठवेल आणि त्यातून मग आम्हाला त्याठिकाणी 4 सीट्स भारतीय जनता पार्टीला मिळतील. असं संख्याबळ आमच्याकडे आहे. या निवडणुकीमध्ये फार निवडणुका न होता बिनविरोध झाल्या पाहिजे. हीच काळजी आपण घेत असतो."

"माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनीही हाच विचार केला आहे. आम्ही सर्वांनी हा विचार केला आहे राज्यामध्ये बिनविरोध निवडणुका व्हाव्यात. पण अटीतटीची परिस्थिती आली किंवा त्यांच्यामध्ये काही एकमत झालं नाही तर मात्र निवडणूक होऊ शकेल." असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com