Chandrashekhar Bawankule : जिल्हा परिषदेच्या निकालावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले...
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Chandrashekhar Bawankule) काल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषदेच्या निकालावर चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "विकासाला मतदान झालं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो ग्रामीण भागाकरता केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजनेमधून जो विकास होऊ शकतो. याबद्दलचा विश्वास आम्ही जनतेमध्ये मांडला."
"जनतेने विकासाला मतदान केलं आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुती ही प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आली आहे." असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Summary
काल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला
जिल्हा परिषदेच्या निकालावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
'महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुती ही प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आली'
