Dharashiv : धाराशिव मतमोजणी केंद्रावर गोंधळ; राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये गोंधळ
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Dharashiv) राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 तारखेला मतदान पार पडलं. आज मतमोजणी पार पडणार असून निकाल लागणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली असून या निवडणुकीसाठी 7 हजार 438 उमेदवार रिंगणात होते. मतमोजणी केंद्राबाहेर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आली आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोया पूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर आता धाराशिव मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाल्याची माहिती मिळत आहे.
राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये हा गोंधळ झाल्याची माहिती मिळत आहे. उमेदवार प्रतिनिधीला आत मध्ये सोडलं जात नसल्याचा आरोप करण्यात येत असून तासाभरापासून आम्हाला गेटवरच अडवला असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला.
Summary
धाराशिव मतमोजणी केंद्रावर गोंधळ
राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये गोंधळ
उमेदवार प्रतिनिधीला ही आत मध्ये सोडलं जात नसल्याचा आरोप
