महाराष्ट्र
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरात पालिकेत सत्ता स्थापनेला वेग; भाजपकडून गटनेता जाहीर करत गट स्थापन
छत्रपती संभाजीनगरात पालिकेत सत्ता स्थापनेला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Chhatrapati Sambhajinagar) महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आता या निकालानंतर लक्ष लागले आहे ते म्हणजे महापौर आणि उपमहापौर कोण होणार? याच पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगरात पालिकेत सत्ता स्थापनेला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपकडून गटनेता जाहीर करत गट स्थापन करण्यात आला आहे. उपमहापौर पदासह इतर सत्तावाटपाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी भाजप–शिवसेना यांच्यात आज बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
छत्रपती संभाजीनगरात पालिकेत सत्ता स्थापनेला वेग
भाजपकडून गटनेता जाहीर करत गट स्थापन
उपमहापौर पदाबाबत चर्चा करण्यासाठी भाजप–शिवसेना यांच्यात बैठक होण्याची शक्यता
