Sindhudurg Fort
Sindhudurg Fort

Sindhudurg Fort : छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा सखोल अभ्यास केला जाणार; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'या' चार किल्ल्यांचा समावेश

आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Sindhudurg Fort ) आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा सखोल अभ्यास केला जाणार असल्याची माहिती मिळत असून यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात

सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट, सर्जेकोट किल्ल्यांचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत मालवणात अध्यासन केंद्र उभारणार असल्याची माहिती मंत्री आशीष शेलार यांनी दिली. यासाठी शासनाकडून 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा सखोल अभ्यास केला जाणार

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार किल्ल्यांचा समावेश

  • सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट, सर्जेकोटचा सखोल अभ्यास करणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com