Devendra Fadnavis : मुख्यमंत्री जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार करणार नाहीत; अजित पवारांच्या निधनामुळे निर्णय
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis) राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार सभा घेणार होते. 7 दिवसांत 22 प्रचारसभा देवेंद्र फडणवीस घेणार होते. मात्र आता मुख्यमंत्री जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार करणार नसल्याची माहिती मिळत असून अजित पवार यांच्या निधनामुळे हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
5 तारखेपर्यंत प्रचारासाठी वेळ आहे. मात्र मुख्यमंत्री एकही सभा घेणार नाहीत. अजित पवार यांच्या निधनामुळे सर्व सभा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Summary
मुख्यमंत्री जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार करणार नाहीत
अजित पवारांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांचा निर्णय
7 दिवसांत 22 प्रचारसभा देवेंद्र फडणवीस करणार होते
