Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे वर्ग
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ajit Pawar) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले.
या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.
अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास आता सीआयडी करणार असून सीआयडी चे पोलीस महानिरीक्षक बसवराज आणि सुधीर हिरेमठ यांनी अपघात घटनास्थळावर भेट दिली होती. या भेटीनंतर सीआयडीने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीनंतर आता सीआयडी या अपघाताचा सगळा तपास करणार आहे.
Summary
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती
अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे वर्ग
