SSC Exam
SSC Exam

SSC Exam : राज्यभरात उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात

राज्यभरात उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(SSC Exam) राज्यभरात उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात होत आहे. राज्यभरातून 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थी परीक्षा देणार असून यामध्ये मुंबई विभागातून 3 लाख 48 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

यामध्ये मुंबई विभागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी या जिल्ह्यांमध्ये 1 हजार 4 परीक्षा केंद्रे असणार आहेत. ही परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत पार पडणार आहे. राज्यात परीक्षा कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून अनेक भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.

परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी 21 भरारी पथके आणि 8 बैठी पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. परीक्षा केंद्रांभोवती 400 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. यंदा परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त वातावरण आणि सुरळीत परीक्षा पार पाडण्यासाठी बोर्ड प्रशासनाने विशेष तयारी केली आहे.

Summary

  • राज्यभरात उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात

  • 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत परीक्षा

  • राज्यभरातून 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थी परीक्षा देणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com