Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील 23 नगरसेवकांविरोधात तक्रारी; तक्रारींची प्रशासनाकडून शहानिशा सुरू

छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील नवनिर्वाचित 23 नगरसेवकांविरोधातील तक्रारी आल्या
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Chhatrapati Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील नवनिर्वाचित 23 नगरसेवकांविरोधातील तक्रारी आल्या असून या तक्रारींविरोधात प्रशासनाकडून शहानिशा सुरू झाली असल्याची माहिती मिळत आहे.

अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम व खोटे शपथपत्र अशा विविध कारणांवर तक्रारी दाखल आहेत. नगररचना विभागाकडून मालमत्तेची कागदपत्रे व प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाणार असून तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे.

काही नगरसेवकांनी अनधिकृत बांधकामे स्वत:हून पाडण्यास सुरुवात केली असल्याची माहिती मिळत असून तक्रारदारांकडून पुरावे सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Summary

  • छत्रपती संभाजीनगरमधील 23 नगरसेवकांविरोधात तक्रारी

  • तक्रारींची प्रशासनाकडून शहानिशा सुरू

  • अतिक्रमण,अनधिकृत बांधकाम अशा विविध कारणांवर तक्रारी दाखल

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com