Congress
Congress

Congress : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक जाहीर; यादीमध्ये कोणाचा समावेश

येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Congress ) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे.

तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. 3 जानेवारी रोजी चिन्हाचं वाटप होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

यामध्ये रमेश चेन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ, छत्रपती शाहू महाराज, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, खा.मुकुल वासनीक, नाना पटोले, इम्रान प्रतापगढी, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, राज बब्बर, यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, पृथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट, बाळासाहेब थोरात, मोहम्मद अझरुद्दीन,

रजनीताई पाटील, माणिकराव ठाकरे, अमिन पटेल, डॉ. नितीन राऊत, सुनिल केदार, अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम, भाई जगताप, अनिस अहमद, रमेश बागवे, खा. हुसेन दलवाई, साजिद खान पठाण, कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी, वसंत पुरके, मुजफ्फर हुसेन, एम.एम. शेख, मोहन जोशी, वजाहत मिर्झा, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, सिद्धार्थ हत्तीअंबिरे व हनुमंत पवार यांचा या यादीत समावेश आहे.

Summary

  • 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार

  • महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक जाहीर

  • खासदार छत्रपती शाहू महाराजांसह , राज बब्बर आणि कन्हैय्या कुमार यांचाही समावेश

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com