Congress Meeting
महाराष्ट्र
Congress Meeting : राज्यसभा निवडणुकीबाबत काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ राहणार उपस्थित
राज्यसभा निवडणुकीबाबत काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक होणार आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Congress Meeting) राज्यसभा निवडणुकीबाबत काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता विधानभवनात ही बैठक पार पडणार असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी 5 मार्चला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून 16 मार्चला मतदान होणार आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत ठरलेला अंतिम निर्णय आणि संभाव्य उमेदवारांची नावे मंजुरीसाठी दिल्लीतील हायकमांडकडे पाठवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
राज्यसभा निवडणुकीबाबत काँग्रेसची आज बैठक
सकाळी 10 वाजता विधानभवनात होणार बैठक
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ राहणार उपस्थित
