Abdul Sattar
Abdul Sattar

Abdul Sattar : आमदार अब्दुल सत्तार यांना न्यायालयाचा दिलासा; रुग्णवाहिका वाटपात गैरव्यवहार केला नसल्याचा निर्वाळा

आमदार अब्दुल सत्तार यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Abdul Sattar) आमदार अब्दुल सत्तार यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका वाटप करताना कोणत्याही गैरव्यवहार केला नसल्याचा निर्वाळा सिल्लोड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिला आहे.

2014 मधील या प्रकरणात तक्रारदार गणेश शंकरलाल शंकरपल्ली यांनी लावलेले आरोप प्रथमदर्शनी सिद्ध होत नसल्याचे नमूद करत न्यायालयाने अर्ज फेटाळला असल्याची माहिती मिळत आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीच्या देखरेखीखालीच रुग्णवाहिका खरेदी व वाटप झाल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. राज्य शासनानेही 19 ऑगस्ट 2014 रोजी विशेष बाब म्हणून मंजूरी दिली होती.

Summary

  • आमदार अब्दुल सत्तार यांना न्यायालयाचा दिलासा

  • रुग्णवाहिका वाटपात गैरव्यवहार केला नसल्याचा निर्वाळा

  • न्यायालयाने आरोपाचा अर्ज फेटाळला

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com