Jitendra Awhad
Jitendra Awhad

Jitendra Awhad : उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अपघातात निधन; ठाण्यात जितेंद्र आव्हाडांकडून श्रद्धांजली अर्पण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Jitendra Awhad) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते.

अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले. या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना एका शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून शहरातील अनेक भागात बॅनर लावण्यात आले आहे. 'महाराष्ट्राचे लाडके दादा, आपण सदैव आठवणीत आहे आणि राहाल' असा भावनिक मजकूर लिहत आव्हाडांनी बॅनरमधून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com